टॉम यांचा देवावर विश्वास होता. पण धर्मांच्या अप्रामाणिकपणामुळे आणि रूढी-परंपरांमुळे त्यांची निराशा झाली. बायबलचा अभ्यास केल्यामुळे त्यांना एक खरी आशा कशी मिळाली?
ईसोलीना लामेला एक कॅथलिक नन होती, पुढे ती एक साम्यवादी कार्यकर्ती बनली, पण या कशातच तिला समाधान मिळाले नाही. नंतर तिला यहोवाचे साक्षीदार भेटले; बायबलचा उपयोग करून त्यांनी तिला जीवनाचा नेमका उद्देश काय ते सांगितले.