व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास करण्यासाठी एक टीप

अभ्यास करण्यासाठी एक टीप

यहोवाच्या मौल्यवान गुणांबद्दल आणखी जाणून घ्या

आपण बायबल वाचतो तेव्हा ते चांगल्या प्रकारे समजून घेता यावं म्हणून आपण संशोधनासाठी असणाऱ्‍या साधनांचा वापर करू शकतो. पण आपण फक्‍त बायबलबद्दल आपलं ज्ञान वाढवण्यासाठी ही माहिती शोधत नाही, तर यहोवाबद्दलचं आपलं प्रेम वाढावं म्हणून आपण हे करतो. आपण स्वतःला विचारू शकतो: ‘बायबलच्या या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?’

म्हणून एखादा अहवाल वाचताना आपण त्यातून प्रेम, बुद्धी, न्याय आणि शक्‍ती यांसारखे यहोवाचे अप्रतिम गुण कसे दिसून येतात हे शोधू शकतो. पण यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वात फक्‍त इतकेच गुण नाहीत, तर इतरही बरेच गुण आहेत. मग त्याच्या या गुणांबद्दल तुम्हाला आणखी माहिती कुठे शोधता येईल?

वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स  या प्रकाशनात “जेहोवा” या विषयाखाली असलेल्या “क्वालिटीज्‌ बाय नेम” (गुणांची यादी) या उपशिर्षकाखाली यहोवाच्या ५० पेक्षा जास्त गुणांची यादी देण्यात आली आहे. तुम्ही वाचत असलेल्या बायबल अहवालात यहोवाचे कोणते गुण पाहायला मिळतात, त्यांवर तुम्ही या यादीचा वापर करून संशोधन करू शकता. (जर तुमच्या भाषेत फक्‍त यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक  हेच प्रकाशन उपलब्ध असलं, तर तुम्ही “यहोवा देव” या विषयाखाली असलेल्या “यहोवाचे गुण” या उपशिर्षकामध्ये पाहू शकता.)