व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हुल्दाने आपलं ध्येय गाठलं

हुल्दाने आपलं ध्येय गाठलं

तुम्ही जर काही वर्षांआधी इंडोनेशियातल्या सँजीर बेसॉर या लहानशा बेटावर गेला असता, तर तुम्हाला या बेटाच्या समुद्रकिनाऱ्‍याला आमच्या तीन ख्रिस्ती बहिणी नक्कीच दिसल्या असत्या. लोकांना बायबल समजून सांगण्याच्या त्यांच्या कामासाठी म्हणजेच त्यांच्या सेवेसाठी बेटावरचे लोक त्यांना चांगलं ओळखतात. पण त्या वेळी त्या एक वेगळंच काम करत होत्या.

उत्तर इंडोनेशियामधलं सँजीर बेसॉर बेट

सगळ्यात आधी त्या समुद्राच्या पाण्यात चालत जायच्या आणि मोठमोठी दगडं किनाऱ्‍याला ओढून आणायच्या. काही दगडं तर फुटबॉलएवढी मोठी असायची. मग त्या बहिणी एका लाकडी स्टूलवर बसून हातोड्याने ही दगडं फोडायच्या आणि त्यांचे कोंबडीच्या अंड्याहून लहान आकाराचे तुकडे करायच्या. नंतर या तुकड्यांना ते एका प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये भरायच्या आणि पायऱ्‍या चढत आपल्या घरापर्यंत घेऊन जायच्या. मग ही दगडं एका मोठ्या बॅगमध्ये भरून ट्रकमध्ये चढवायच्या. या दगडांचा उपयोग पुढे रस्ता बनवण्यासाठी केला जायचा.

समुद्रकिनाऱ्‍यावरची दगडं गोळा करताना हुल्दा

या बहिणींपैकी एक होती हुल्दा. तिच्या परिस्थितीमुळे तिला इतरांपेक्षा जास्त वेळ या कामाला देता येत होता. सहसा यातून मिळणाऱ्‍या सगळ्या पैशांचा वापर ती कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी करायची. पण आता तिच्या मनात आणखी एक ध्येय होतं. तिला JW लायब्ररी  ॲप वापरता यावं म्हणून तिला एक टॅब हवा होता. तिला माहीत होतं, की त्यातल्या व्हिडिओंमुळे आणि इतर माहितीमुळे तिला तिचं सेवाकार्य आणखी चांगल्या प्रकारे करता येईल आणि बायबल चांगल्या प्रकारे समजून घेता येईल.

हुल्दाने दीड महिने दररोज सकाळी दोन तास दगडं फोडायचं काम केलं. आणि एक छोटा ट्रक भरेल इतकी दगडं फोडली. आणि अशा प्रकारे तिने एक टॅब खरेदी करता येईल इतके पैसे जमा केले.

आपला टॅब घेऊन उभी असलेली हुल्दा

हुल्दा म्हणते, “हे काम करताना माझी खूप दमछाक व्हायची आणि माझं अंगही खूप दुखायचं. पण जेव्हा नवीन टॅब माझ्या हातात आला, तेव्हा मी माझं सगळं दुखणं विसरून गेले. कारण त्यामुळे मला सेवाकार्य खूप चांगल्या प्रकारे करता येत होतं आणि सभांची तयारी करणंही खूप सोपं झालं होतं.” तिने असंही म्हटलं, की कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात तिला या टॅबमुळे खूप मदत झाली. कारण त्या वेळी मंडळीच्या सगळ्या गोष्टी ऑनलाईनच होत होत्या. खरंच, हुल्दा आपलं ध्येय गाठू शकली याबद्दल आपल्या सगळ्यांनाच खूप आनंद आहे!