“मला हवे असलेले सर्व मला मिळाले”
“मला हवे असलेले सर्व मला मिळाले”
संपूर्ण जगभरात १२ कोटी पेक्षा अधिक लोकांना सध्या नैराश्याने ग्रासले आहे, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालाने दिला. दर वर्षी, दहा लाख लोक आत्महत्या करतात आणि एक ते दोन कोटी लोक आपले जीवन समाप्त करण्याचा प्रयत्न करतात. नैराश्य आलेल्या लोकांसाठी काय मदत आहे? वैद्यकीय उपचारामुळे त्यांचे दुःख कमी होऊ शकते; अशा लोकांना मानसिक आधाराची देखील अत्यंत गरज असते. शिवाय, नैराश्याचा सामना करणाऱ्या काहींना, यहोवाच्या साक्षीदारांच्या बायबल आधारित प्रकाशनांतून मदत मिळाली आहे; हे फ्रान्सहून आलेल्या पुढील पत्रातून दिसून येते.
“अलीकडेच, मला जीवन जगण्यात काहीच अर्थ नाही असे वाटू लागले होते. मला मरण येऊ दे, अशी मी देवाला प्रार्थना केली. मी जणू आतून मेलेच होते. मला मार्गदर्शन हवे होते, म्हणून मी यहोवाला अतिशय कळकळीनं प्रार्थना केली. मी, यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिकपुस्तक २००२ (इंग्रजी), हेही वाचण्याचे ठरवले आणि तीन दिवसांत वाचून संपवले. त्यानंतर मात्र, मला कबूल करावे लागले, की त्यातून मला खूप प्रोत्साहन मिळाले आणि माझा विश्वास मजबूत झाला.
“मी टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांमध्ये संशोधन केले, आणि काय आश्चर्य! मी १५ वर्षांपासून नियमाने ही नियतकालिके वाचत होते, पण त्यातले लेख किती प्रोत्साहनदायक व प्रेरणादायक आहेत याची मला कधीही जाणीव नव्हती. हे लेख प्रेमाने ओतप्रोत भरले आहेत—या दिवसांत हा गुण क्वचितच पाहायला मिळतो. मला हवे असलेले सर्व काही मिळाले.”
बायबल म्हणते: “परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो.” (स्तोत्र ३४:१८) यात काहीच शंका नाही, की ‘भग्नहृदयी लोकांना’ किंवा ‘अनुतप्त मनाच्या लोकांना’ बायबलमधून उत्तेजन मिळू शकते, भवितव्यासाठी एक आशा मिळू शकते. या ईश्वरप्रेरित सांत्वनाच्या स्रोताचा लाभ मिळवण्यासाठी यहोवाचे साक्षीदार गरजवंत लोकांना बायबल आधारित प्रकाशने देत आहेत.