आर्मगेडनचे युद्ध केव्हा सुरू होईल?
आर्मगेडनचे युद्ध केव्हा सुरू होईल?
“मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा . . . मोठा लोकसमुदाय . . . मोठ्या संकटातून” बाहेर येतो.—प्रकटीकरण ७:९, १४.
आर्मगेडनचे युद्ध लवकरच सुरू होईल, हे कशावरून म्हणता येईल?
यहोवाची उपासना करणाऱ्या आणि बायबलच्या उच्च नैतिक स्तरांनुसार जीवन जगणाऱ्या लोकांचा एक जगव्याप्त समाज आज अस्तित्वात आहे. देवाच्या पाठिंब्यामुळे निरनिराळ्या भाषा बोलणारे लाखो लोक सर्व राष्ट्रांतून व वंशातून एका संयुक्त, प्रेमळ बंधुसमाजात एकत्र येत आहेत. हा बंधुसमाज यहोवाच्या साक्षीदारांमध्ये अस्तित्वात आहे.—योहान १३:३५.
सैतान लवकरच आपली सैन्ये गोळा करेल आणि या शांतीप्रिय व निराधार वाटणाऱ्या लोकांवर आपला शेवटचा सगळ्यात मोठा हल्ला करेल. (यहेज्केल ३८:८-१२; प्रकटीकरण १६:१३, १४, १६) हे आपण खातरीने कसे म्हणू शकतो? बायबलमध्ये काही विशिष्ट घटनांचे वर्णन करण्यात आले आहे; त्यांवरून आर्मगेडनचे युद्ध केव्हा सुरू होईल हे आपण समजू शकतो. त्यांपैकी बऱ्याच घटना आज आपल्या दिवसांत पूर्ण होत आहेत.
आज कोणत्या घटना पूर्ण होत आहेत?
“जगाचा शेवट होण्याचा काळ जवळ आला आहे” हे लोकांना कसे समजेल असा प्रश्न येशूच्या शिष्यांनी त्याला विचारला होता. (मत्तय २४:३, ईझी टू रीड व्हर्शन) या प्रश्नाचे उत्तर देताना येशूने त्यांना एका विशिष्ट अशा काळाविषयी सांगितले जेव्हा “राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील.” त्याने पुढे म्हटले: “या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होत.” (मत्तय २४:७, ८) प्रेषित पौलाने याच काळाचे वर्णन करताना म्हटले: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील.” (२ तीमथ्य ३:१) या भविष्यवाण्यांमध्ये वर्णन केलेल्या घटना आज आपल्या काळात पूर्ण होताना आपण पाहत नाही का?
हा काळ इतका कठीण का असेल? याचे उत्तर प्रेषित योहान आपल्याला देतो. त्याने असे भाकीत केले होते, की असा एक “थोडा काळ” असेल जेव्हा सैतान व त्याचे दुरात्मे पृथ्वीवर खूप कार्यशील असतील. त्या प्रकटीकरण १२:७-१२) आज केवळ एकाच ठिकाणचे नव्हे, तर सबंध जगातील लोक अतिशय रागीट व हिंसक वृत्तीचे झाले आहेत असे तुम्हाला वाटत नाही का?
काळात सैतान “अतिशय संतप्त” झालेला असेल असे बायबल म्हणते. (येशूने असेही म्हटले, की या कठीण काळात एक अनन्यसाधारण कार्य केले जाईल. त्याने म्हटले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून [देवाच्या] राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) आज, २३५ पेक्षा जास्त देशांत यहोवाचे साक्षीदार ५०० पेक्षा अधिक भाषांत देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत आहेत. यहोवाचे साक्षीदार प्रकाशित करत असलेली दोन बायबल-आधारित नियतकालिके म्हणजे टेहळणी बुरूज आणि अवेक! आज जगातील सगळ्यात जास्त वितरित केली जाणारी नियतकालिके आहेत. या शिवाय, साक्षीदारांनी सुमारे १०० भाषांमध्ये बायबलचे भाषांतर केले आहे. त्यांचे हे कार्य स्वयंसेवकांद्वारे केले जाते आणि ते सर्वस्वी ऐच्छिक अनुदानावर चालते. प्रचाराची ही उल्लेखनीय मोहीम येशूच्या भविष्यवाणीची पूर्णता तर नसेल?
यहोवा देव आणि त्याचा विरोध करणारे यांच्यात कोणत्या घटनांमुळे युद्ध सुरू होईल त्या घटनांचेही वर्णन बायबल करते. अशा तीन भविष्यवाण्या विचारात घ्या ज्या तुम्ही पूर्ण होताना पाहाल.
लवकरच तुम्ही कोणत्या घटना पाहाल?
भविष्यवाणी १. बायबल म्हणते, की राष्ट्रे “शांती व सुरक्षितपणा आहे” अशी जगव्याप्त घोषणा करतील. जगातील मोठ्या समस्या सोडवण्यात आपण यशस्वी झालो आहोत असे त्यांना वाटेल. पण, शांती व सुरक्षिततेची घोषणा केल्यानंतर ज्या घटना घडतील त्या मुळीच शांतीपूर्ण नसतील.—१ थेस्सलनीकाकर ५:१-३, पं.र.भा.
भविष्यवाणी २. यानंतर, निरनिराळे सरकार जगातील धार्मिक संघटनांवर हल्ला करण्याचे ठरवतील. बायबलमध्ये, या सरकारांना लाक्षणिक भाषेत श्वापद म्हटले आहे आणि जगातील खोट्या धर्मांना स्त्री म्हटले आहे, जी या श्वापदावर बसलेली आहे. (प्रकटीकरण १७:३, १५-१८) हे लाक्षणिक श्वापद देवाचे प्रतिनिधित्व करण्याचा खोटा दावा करणाऱ्या धर्मांचा नाश करेल आणि असे करण्याद्वारे ते नकळतपणे देवाची इच्छा पूर्ण करेल.
प्रेषित योहानाने या संपूर्ण घटनेचे वर्णन लाक्षणिक भाषेत पुढीलप्रमाणे केले: “जी दहा शिंगे तू पाहिली ती आणि ते श्वापद ही कळवंतीणीचा द्वेष करतील, आणि तिला ओसाड आणि नागवी करतील, आणि तिचे मांस खातील, आणि अग्नीने तिला जाळून टाकतील. कारण देवाची वचने पूर्ण होतील तोपर्यंत देवाने आपली इच्छा पूर्ण करण्याचे . . . त्यांच्या अंतःकरणात घातले.”—प्रकटीकरण १७:१६, १७, पं.र.भा.
भविष्यवाणी ३. खोट्या धर्मावरील या यशस्वी हल्ल्यानंतर यहोवा देवाची उपासना करणाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी सैतान जगातील राष्ट्रांचे नेतृत्व करेल.—प्रकटीकरण ७:१४; मत्तय २४:२१.
तुमच्यावर काय परिणाम होईल?
तुम्ही जर बायबलचा बारकाईने अभ्यास केला नसेल, तर वर उल्लेखिलेल्या घटना घडतील यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण, या घटनांबद्दल सांगितलेली प्रत्येक गोष्ट पूर्ण होईल आणि या घटना नजीकच्या भविष्यात पूर्ण होतील यावर विश्वास ठेवण्यासाठी आधार आहे. तो म्हणजे, बायबलमधील पूर्ण झालेल्या असंख्य भविष्यवाण्या. *
देवाच्या मोठ्या दिवसाची लढाई लवकरच सुरू होईल यावर यहोवाच्या साक्षीदारांचा इतका पक्का विश्वास का आहे, तसेच तुम्हाला या लढाईची भीती बाळगण्याचे कारण का नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही थोडा वेळ काढू शकता का? आर्मगेडनच्या वेळी यहोवा देव ज्यांचे संरक्षण करेल त्यांपैकी एक असण्याकरता तुम्ही काय केले पाहिजे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलची चर्चा करू शकता. (प्रकटीकरण १६:१४) बायबलमधून तुम्ही जे शिकाल त्यामुळे भविष्याबद्दल तुमचा दृष्टिकोन सकारात्मक होईल. (w१२-E ०२/०१)
[तळटीप]
^ परि. 17 बायबलमधील भविष्यवाण्या तंतोतंत पूर्ण झाल्या आहेत याचा पुरावा पाहण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय २ आणि ९ पाहा.
[८ पानांवरील संक्षिप्त आशय]
यहोवाच्या साक्षीदारांचे कार्य बायबलमधील भविष्यवाणीची पूर्णता असू शकते का?