व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

या जगात सर्वत्र दुःख आहे, पण देव याला जबाबदार आहे का?

बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?

बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?

आपल्यावर येणाऱ्या दुःखांसाठी देव जबाबदार आहे का?

तुम्ही काय म्हणाल?

  • हो

  • नाही

  • कदाचित

बायबलमध्ये काय सांगितलं आहे

“देवाकडून दुष्कर्म व्हावे, सर्वसमर्थाकडून अन्याय व्हावा, ही कल्पनाही करायला नको.” (ईयोब ३४:१०) या जगात होणाऱ्या वाईट गोष्टी आणि समस्या देव आपल्यावर कधीच आणणार नाही.

बायबलमधून आपण आणखी काय शिकू शकतो?

  • दियाबल सैतान, जो या “जगाचा अधिकारी” आहे तो आपल्यावर येणाऱ्या समस्यांचं मुख्य कारण आहे.—योहान १४:३०.

  • लोक जे चुकीचे निर्णय घेतात त्यामुळे बऱ्याचदा त्यांना दुःख आणि समस्यांना सामोरं जावं लागतं.—याकोब १:१४, १५.

दुःख कधी संपेल का?

काही लोक काय विश्वास करतात मानवांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तर ते दुःख-त्रास काढू शकतात असं काही म्हणतात. तर काहींचं म्हणणं आहे की, जगाच्या परिस्थितीत सुधारणा होणार नाही. तुम्हाला काय वाटतं?

बायबलमध्ये काय सांगितलं आहे

देव दुःख-त्रास काढून टाकेल. “यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.”—प्रकटीकरण २१:३, ४.

बायबलमधून आपण आणखी काय शिकू शकतो?

  • सैतानामुळे निर्माण झालेल्या समस्या देव आपल्या राज्याद्वारे काढून टाकेल.—दानीएल २:४४.

  • चांगले लोक या पृथ्वीवर सर्वदा वास करतील.—स्तोत्र ३७:९-११, २९.