प्रस्तावना
आज आपण अशा एका काळात जगत आहोत जेथे विवाह व कुटुंब धोक्यात आहेत. अशा कठीण काळात कुटुंब या नात्याने आनंदी जीवन जगणे शक्य आहे का? अर्थात, हे इतके सोपे नसले, तरी अशक्य आहे असे नाही. या माहितीपत्रकात वैवाहिक जीवनातील प्रत्येक पैलूची चर्चा केली नसली, तरी त्यात बायबलची भरवशालायक तत्त्वे व व्यवहारोपयोगी सल्ले दिले आहेत. त्यांचे प्रामाणिकपणे पालन केल्यास, तुमचे कौटुंबिक जीवन अधिक आनंदी होऊ शकते.