भाग १४
तुम्ही यहोवाला विश्वासू आहात हे कसं दाखवाल?
यहोवाची बाजू घ्या. १ पेत्र ५:६-९
बायबलच्या विरोधात असलेल्या कोणत्याही रितीरिवाजांत भाग घेऊ नका. असं करण्यासाठी तुम्हाला हिंमत दाखवावी लागेल.
राजकारणात भाग घेऊ नका. कारण जगातली राष्ट्रं यहोवाला आणि त्याच्या राज्याला पाठिंबा देत नाहीत.
मत्तय ७:२४, २५
योग्य निवड करा—देवाचं ऐका.नियमितपणे यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना हजर राहा. यामुळे देवासोबत तुमचं नातं दिवसेंदिवस घट्ट होईल.
देवाबद्दल शिकत राहा आणि त्याच्या आज्ञांप्रमाणे वागायचा प्रयत्न करा.
आतापर्यंत शिकलेल्या गोष्टींवर तुमचा पक्का विश्वास बसला आहे का? तर मग, तुम्ही यहोवाला आपलं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला पाहिजे.—मत्तय २८:१९.
देवाचं ऐका. बायबल नियमितपणे वाचा आणि ते समजून घ्यायला यहोवाच्या साक्षीदारांकडून मदत घ्या. मग तुम्ही जे शिकलात त्याप्रमाणे वागा. असं केल्यामुळे तुम्ही कायम या पृथ्वीवर आनंदाने जगू शकाल.—स्तोत्र ३७:२९.