अनुवाद ३२:१-५२

  • मोशेचं गीत (१-४७)

    • यहोवा, एक खडक ()

    • इस्राएल आपल्या खडकाला विसरतो (१८)

    • “सूड घेणं माझं काम आहे” (३५)

    • “राष्ट्रांनो, त्याच्या लोकांसोबत आनंदी व्हा” (४३)

  • मोशेचा मृत्यू नबो पर्वतावर होणार (४८-५२)

३२  “अहो आकाशांनो, मी बोलीन ते कान लावून ऐका. आणि पृथ्वी माझ्या तोंडून निघणारे शब्द ऐको.  २  माझ्या सूचना पावसासारख्या पडतील;माझे शब्द गवतावर पडणाऱ्‍या रिमझिम पावसासारखे,हिरवळीवर कोसळणाऱ्‍या सरींसारखे,आणि झिरपणाऱ्‍या दवासारखे असतील.  ३  कारण मी यहोवाचं नाव घोषित करीन.+ लोकांनो, तुम्ही आपल्या देवाच्या महानतेबद्दल सांगा!+  ४  तो खडक आहे; त्याची कार्यं परिपूर्ण+आणि त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत.+ तो विश्‍वासू देव आहे,+ तो कधीच अन्याय करत नाही,+तो नीतिमान आणि प्रामाणिक आहे.+  ५  हे लोकच दुष्टपणे वागले आहेत.+ ती त्याची मुलं नाहीत, दोष त्यांच्यातच आहे.+ ही दुष्ट आणि कपटी पिढी आहे!+  ६  अरे मूर्ख आणि अविचारी लोकांनो,+तुम्ही यहोवाशी असं वागावं का?+ तोच तुम्हाला जीवन देणारा, तुमचा पिता नाही का?+ त्यानेच तुम्हाला घडवून, स्थिर केलं नाही का?  ७  जरा जुने दिवस आठवा;मागच्या पिढ्यांबद्दल विचार करा. आपल्या पित्याला विचारा, म्हणजे तो तुम्हाला सांगेल;+आपल्या वडीलधाऱ्‍यांना विचारा, म्हणजे ते तुम्हाला सांगतील.  ८  सर्वोच्च देवाने जेव्हा राष्ट्रांना त्यांचा वारसा दिला,+जेव्हा त्याने आदामच्या मुलांना* एकमेकांपासून वेगळं केलं,+तेव्हा त्याने इस्राएलच्या मुलांच्या संख्येप्रमाणे+राष्ट्रांच्या सीमा ठरवल्या.+  ९  कारण यहोवाचे लोक त्याचा वाटा आहेत;+याकोब त्याचा वारसा आहे.+ १०  तो त्याला एका ओसाड रानात,+एका निर्जन वाळवंटात सापडला; तिथे जंगली प्राण्यांचे आवाज ऐकू यायचे.+ त्याचं संरक्षण करण्यासाठी त्याने त्याला घेरा घातला, त्याचा सांभाळ केला,+त्याने आपल्या डोळ्यातल्या बाहुलीसारखं* त्याला जपलं.+ ११  गरुड जसा आपलं घरटं हलवतो,आपल्या पिल्लांवर तरंगत राहतो,आणि आपले पंख पसरूनत्यांना त्यांवर उचलून घेतो,+ १२  तसाच यहोवा स्वतः याकोबला मार्ग दाखवत राहिला;+त्याच्यासोबत कोणी परका देव नव्हता.+ १३  देवाने त्याला पृथ्वीच्या उच्च स्थानांवर स्वारी करू दिली.+ त्याने शेतांचा उपज खाल्ला.+ देवाने खडकातल्या मधाने त्याचं पोषण केलं. गारगोटी खडकांतलं तेल, १४  गायींचं लोणी आणि मेंढ्यांचं दूध,तसंच धष्टपुष्ट मेंढेआणि बाशानचे एडके व बकरे,यांसोबत सगळ्यात उत्तम गहू त्याने खाल्ला;+आणि तो रसाळ द्राक्षांची मदिरा* प्यायला. १५  पण यशुरून* लठ्ठ झाला, तेव्हा धीटपणे लाथा मारू लागला. (तू धष्टपुष्ट झाला आहेस, फुगला आहेस.)+ म्हणून त्याने आपल्या निर्माणकर्त्या देवाला सोडून दिलं,+आणि आपल्या तारणाच्या खडकाला तुच्छ लेखलं. १६  परक्या देवांना नमन करून त्यांनी त्याला भडकवलं;+घृणास्पद गोष्टींनी ते त्याला चीड आणत राहिले.+ १७  ते देवाला नाही, तर दुष्ट स्वर्गदूतांना बलिदानं देत होते,+त्यांना ज्यांची ओळख नव्हती अशा देवांना,अलीकडेच आलेल्या नवीन देवांना,तुमच्या वाडवडिलांनाही माहीत नसलेल्या देवांना ते बलिदानं देत होते. १८  तुला जन्म देणाऱ्‍या खडकाला तू विसरलास,+आणि तुला जीवन देणाऱ्‍या देवाची तू आठवण ठेवली नाहीस.+ १९  यहोवाने हे पाहिलं, तेव्हा त्याने त्यांच्याकडे पाठ फिरवली+कारण त्याच्या मुलांनी व मुलींनी त्याला चीड आणली होती. २०  तो म्हणाला, ‘त्यांच्यापासून मी माझं तोंड फिरवीन;+त्यांचं काय होतं ते मी पाहीन. कारण ही एक विकृत* पिढी आहे,+अजिबात विश्‍वासू नसलेली ही मुलं आहेत.+ २१  जो मुळात देवच नाही, त्याला नमन करून त्यांनी मला भडकवलं;*+निरुपयोगी देवांची उपासना करून त्यांनी मला चीड आणली;+आता मीही अशा राष्ट्राकडून त्यांना ईर्ष्येला पेटवीन, जे मुळात राष्ट्रच नाही;+एका मूर्ख राष्ट्राद्वारे मी त्यांना चीड आणीन.+ २२  कारण माझ्या रागाने एक अग्नी पेटला आहे;+तो कबरेच्या* तळापर्यंत जळत जाईल,+तो पृथ्वी आणि तिचं उत्पन्‍न भस्म करेलआणि पर्वतांचे पायथे जाळून टाकेल. २३  मी त्यांची संकटं वाढवीन;माझे सगळे बाण त्यांच्यावर चालवीन. २४  ते भुकेने कासावीस होतील+आणि तीव्र तापाने ग्रस्त होतील. त्यांच्यावर भयंकर नाश ओढवेल.+ मी त्यांच्यामध्ये फाडून खाणारे हिंस्र पशू,+आणि जमिनीवर सरपटणारे विषारी प्राणी पाठवीन. २५  बाहेर, तलवार त्यांच्या मुलांचा घात करेल+आणि घरात त्यांच्या मनात दहशत बसेल.+ तरुण मुलं आणि मुली* काय,तान्हं बाळ आणि पिकल्या केसांचा माणूस काय, सर्वांची अशीच दशा होईल.+ २६  मी असं म्हणालो असतो: “मी यांची पांगापांग करतो;लोकांना यांची आठवणही राहणार नाही असं करतो,” २७  पण शत्रू काय म्हणतील याची मला भीती होती,+कारण विरोधकांनी याचा चुकीचा अर्थ काढला असता.+ ते म्हणाले असते: “हे सगळं यहोवाने केलं नाही,तर आम्ही आमच्याच बळाने विजयी झालो.”+ २८  कारण या राष्ट्राच्या लोकांना अजिबात बुद्धी नाही,*त्यांच्यात जराही शहाणपण नाही.+ २९  ते समंजस* असते तर किती बरं झालं असतं!+ त्यांनी यावर मनन केलं असतं.+ आपलं काय होईल याचा त्यांनी विचार केला असता.+ ३०  फक्‍त एक माणूस हजारांचा पाठलाग कसा करू शकतो? आणि फक्‍त दोघं, दहा हजारांना कसे पळवून लावू शकतात?+ त्यांच्या खडकाने त्यांना विकल्याशिवाय,+आणि यहोवाने त्यांना शत्रूंच्या हाती दिल्याशिवाय हे शक्य नाही. ३१  कारण त्यांचा खडक आपल्या खडकासारखा नाही,+आपल्या शत्रूंनाही हे कळून चुकलंय.+ ३२  त्यांचा द्राक्षवेल सदोमच्या द्राक्षवेलापासूनआणि गमोराच्या द्राक्षमळ्यांतून निघालाय.+ त्यांची द्राक्षं विषारी आहेत,त्यांचे द्राक्षांचे घड कडू आहेत.+ ३३  त्यांचा द्राक्षारस सापांच्या विषासारखा,नागांच्या जीवघेण्या विषासारखा आहे. ३४  त्यांची सगळी कृत्यं माझ्याजवळ साठवलेली आहेत,ती माझ्या कोठारात बंद आहेत.+ ३५  सूड घेणं माझं काम आहे, मी परतफेड करीन,+ठरलेल्या वेळी त्यांचा पाय घसरेल,+त्यांच्या संकटांचा दिवस जवळ आहे,आणि त्यांच्यावर ओढवणारे प्रसंग वेगाने येत आहेत.’ ३६  कारण यहोवा आपल्या लोकांचा न्याय करेल,+आपल्या सेवकांमध्ये जराही शक्‍ती राहिली नाही हे पाहून; त्यांच्यात फक्‍त लाचार आणि कमजोर उरले आहेत हे पाहून,त्याला आपल्या सेवकांचा कळवळा येईल.*+ ३७  तेव्हा तो म्हणेल, ‘त्यांचे देव कुठे आहेत?+ त्यांनी ज्याचा आश्रय घेतला होता, तो त्यांचा खडक कुठे आहे? ३८  त्यांच्या बलिदानांची चरबी खाणारे,*त्यांच्या पेयार्पणाचा द्राक्षारस पिणारे कुठे आहेत?+ आता त्यांनीच उठून तुम्हाला मदत करावीआणि त्यांनीच तुम्हाला आश्रय द्यावा. ३९  तेव्हा आता तरी ओळखा की मी, मीच देव आहे,+आणि माझ्याशिवाय इतर कोणतेही देव नाहीत.+ मारणारा मीच आणि जिवंत करणाराही मीच आहे.+ मीच घायाळ करतो+ आणि मीच बरं करतो,+माझ्या हातून सोडवू शकेल असा कोण आहे?+ ४०  मी माझा हात आकाशाकडे उचलून म्हणतो,“माझ्या सर्वकाळाच्या जीवनाची शपथ,”+ ४१  जेव्हा मी माझ्या चकाकणाऱ्‍या तलवारीला धार लावीनआणि न्याय करण्यासाठी माझा हात उचलीन,+तेव्हा मी माझ्या शत्रूंचा सूड घेऊन त्यांची परतफेड करीन,+आणि माझा द्वेष करणाऱ्‍यांना शिक्षा देईन. ४२  माझे बाण रक्‍त पिऊन धुंद होतील,ते घात झालेल्यांचं आणि बंदिवानांचं रक्‍त पितील;मी शत्रूंच्या पुढाऱ्‍यांची डोकी कापून टाकीन,माझी तलवार त्यांचं मांस खाईल.’ ४३  राष्ट्रांनो, त्याच्या लोकांसोबत आनंदी व्हा,+कारण तो आपल्या सेवकांच्या रक्‍ताचा सूड घेईल,+तो आपल्या शत्रूंचा सूड घेऊन त्यांची परतफेड करेल+आणि आपल्या लोकांच्या देशासाठी प्रायश्‍चित्त करेल.”* ४४  अशा रितीने मोशेने, नूनचा मुलगा होशा*+ याच्यासोबत मिळून, या गीताचे सर्व शब्द इस्राएली लोकांना ऐकवले.+ ४५  सर्व लोकांना हे गीत ऐकवल्यावर, ४६  मोशे त्यांना म्हणाला: “आज मी तुम्हाला जो इशारा दिला आहे, त्याप्रमाणे या सर्व गोष्टींकडे मन लावा,+ म्हणजे तुम्ही आपल्या मुलाबाळांना या नियमशास्त्रातल्या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळायला शिकवू शकाल.+ ४७  कारण हे फक्‍त पोकळ शब्द नाहीत, तर हे तुमचं जीवन आहे,+ आणि या गोष्टी पाळल्या तर तुम्ही यार्देन पार करून ज्या देशात जात आहात, तिथे तुम्हाला मोठं आयुष्य लाभेल.” ४८  त्याच दिवशी यहोवा मोशेला म्हणाला: ४९  “यरीहोसमोर मवाब देशातल्या, अबारीम डोंगरांतल्या+ नबो पर्वतावर+ जा आणि मी इस्राएली लोकांना जो कनान देश वारसा म्हणून देत आहे, तो देश पाहा.+ ५०  मग, जसा तुझा भाऊ अहरोन याचा होर पर्वतावर मृत्यू झाला+ आणि तो आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला,* तसाच या पर्वतावर गेल्यावर तुझाही मृत्यू होईल आणि तूही आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील, ५१  कारण झिनच्या ओसाड रानात, कादेशमध्ये मरीबा इथे वाहणाऱ्‍या पाण्याजवळ,+ तुम्ही दोघंही इस्राएली लोकांसमोर माझ्याशी अविश्‍वासूपणे वागलात आणि तुम्ही इस्राएली लोकांसमोर मला पवित्र ठरवलं नाही.+ ५२  म्हणून, मी इस्राएली लोकांना देत असलेल्या देशात तू जाऊ शकणार नाहीस. तो देश तू दुरूनच पाहशील.”+

तळटीपा

किंवा कदाचित, “मानवजातीला.”
किंवा “बुबुळासारखं.”
किंवा “द्राक्षारस;” शब्दशः “रक्‍त.”
म्हणजे, “सरळ माणूस,” इस्राएलसाठी वापरलेली एक आदराची पदवी.
किंवा “दुष्ट.”
किंवा “ईर्ष्येला पेटवलं.”
हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.
किंवा “कुमारी.”
किंवा कदाचित, “सल्ल्याकडे दुर्लक्ष करतं.”
किंवा “बुद्धिमान.”
किंवा “सेवकांबद्दल पस्तावा होईल.”
किंवा “त्यांची सगळ्यात उत्तम बलिदानं खाणारे.”
किंवा “शुद्ध करेल.”
यहोशवाचं मूळ नाव. होशा हे होशाया या नावाचं संक्षिप्त रूप असून त्याचा अर्थ, “याहने वाचवलेला; याहने वाचवलं” असा होतो.
काव्यात मरणाला सूचित करणारा वाक्यांश.