स्तोत्रं १२७:१-५
-
देवाशिवाय सर्वकाही व्यर्थ आहे
-
“जर यहोवाने घर बांधलं नाही” (१)
-
चढणीचं गीत. शलमोनचं स्तुतिगीत.
१२७ जर यहोवाने घर बांधलं नाही,तर बांधकाम करणाऱ्यांची मेहनत व्यर्थ आहे.+
जर यहोवाने शहराचं रक्षण केलं नाही,+तर पहारेकऱ्यांचं जागं राहणं व्यर्थ आहे.
२ तुम्ही लवकर उठता,आणि उशिरापर्यंत जागूनअन्न मिळवण्यासाठी धडपड करता, हेही व्यर्थच आहे.
कारण तो आपल्या प्रिय सेवकांच्या गरजा भागवतो;तो त्यांना चांगली झोपही देतो.+
३ पाहा! मुलं* यहोवाकडून मिळालेला वारसा आहेत;+पोटचं फळ देवाकडून मिळालेला आशीर्वाद आहे.+
४ तरुणपणी झालेली मुलं,शूरवीराच्या हातातल्या बाणांसारखी असतात.+
५ ज्याचा भाता अशा बाणांनी भरलेला असतो, तो माणूस सुखी आहे!+
त्यांना* लज्जित व्हावं लागणार नाही.
कारण शहराच्या फाटकांत ती* शत्रूंशी बोलतील.
तळटीपा
^ किंवा “पुत्र.”
^ हे कदाचित मुलांच्या वडिलांना सूचित करत असावं.
^ हे कदाचित मुलांना सूचित करत असावं.