व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचं कुटुंब

यहोवाचं कुटुंब
  1. १. स्वप्न हे, मी पाहिले होते—

    मैत्री ही असावी, खरी नि कायमची.

    उन्हात रखरखत्या जगाच्या ना मला,

    सापडली नाती, जी देतील सावली.

  2. २. आज या मनाला, आनंद हा

    जे पाहिले मी स्वप्नात, ते स्वप्न आज ना.

    देवाच्या लोकांत मला जी लाभली,

    मैत्री ना केवळ, जणू रक्‍ताची ही नाती.

    (जोडणाऱ्‍या ओळी)

    माया भावांची अन्‌ बहिणींची, आई-बापांची

    कोणी ना परका इथे, आपुलकी अशी.

    जरी भाषा आणि वेष हे वेगळे आमचे,

    सारे आम्ही एक, हे कुटुंब याहाचे.

  3. ३. हे प्रेम अनोखे, साऱ्‍या जगात.

    आहे या एकतेचा आम्हाला अभिमान.

    कायम राहतील हे बंध प्रेमाचे,

    ना सोडू कधी हे कुटुंब याहाचे.

    (जोडणाऱ्‍या ओळी)

    हो, जरी भाषा नि वेष हे वेगळे आमचे,

    सारे आम्ही एक, हे कुटुंब याहाचे.

  4. ४. सागर यहोवा प्रेमाचा, दयेचा.

    बोलावे तो साऱ्‍यांना, कायमसाठी होण्या,

    खऱ्‍या अर्थाने देवाची लेकरे,

    राहील मग सदा हे कुटुंब याहाचे—

    सदा, हे कुटुंब याहाचे,

    हो सदा,

    सर्वदा.