गीत २९
खरेपणाने चालणे
१. देवा याहा, पारख तू मला
सोनार गाळितो सुवर्णाला जसा,
मलीनता जराही राहो ना
करावे शुद्ध तू, असे माझ्या मना.
(कोरस)
संकल्प हा माझा अटळ, याहा,
राखेन अभंग मी, माझा खरेपणा!
२. वीट मला येतो अनीतीचा,
दुष्टांच्या मैफिली ना बसवे मला.
सांभाळ तू याहा माझ्या जिवा,
नको गणू कधी दुर्जनांत मला.
(कोरस)
संकल्प हा माझा अटळ, याहा,
राखेन अभंग मी, माझा खरेपणा!
३. मंदिर तुझे प्रिय वाटे मला,
फिरेन भोवती पवित्र वेदीच्या.
माझ्या देवा, निघेल सर्वदा
कंठातुनी माझ्या, तुझाच महिमा.
(कोरस)
संकल्प हा माझा अटळ, याहा,
राखेन अभंग मी, माझा खरेपणा!
(स्तो. २५:२ देखील पाहा.)