गीत ५२
मनाचे रक्षण करा
१. पतंगापरी मन उडे
आहे फितूर हे.
या ढील देता, वाऱ्याच्या
वेगाने धावते.
मांजा बुद्धीचा ताणुनी
हे ताब्यात ठेवा.
न्याहाळितो याह याची
प्रत्येक कल्पना.
२. मनाची वृत्ती सर्वदा
ठेवा नम्र अशी,
कुंभाराच्या हाती ओली,
मऊ माती जशी.
याहाची वचने देती
आकार जीवना,
ती पाळता शोभिवंत
लाभे रूप मना.
३. मनी साठविता कण
भल्या विचारांचे,
करती उत्पन्न ते मोती
अनमोल ज्ञानाचे.
मनाच्या सत्त्वाचे जतन
करता दैनंदिनी,
राहील मैत्री याहाची
टिकुनी जीवनी.
(स्तो. ३४:१; फिलिप्पै. ४:८; १ पेत्र ३:४ देखील पाहा.)